देशातील ४१ वाघांचा सात महिन्यात मृत्यू

tiger
नवी दिल्ली – देशात व्याघ्र संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना मागील सात महिन्यात देशातील तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि ट्रॅफिक इंडियाने ही माहिती दिली आहे. तब्बल ४१ वाघांचा या वर्षी जानेवारी ते नऊ ऑगस्ट या कालावधीत मृत्यू झाला.

नैसर्गिक कारणांसोबतच, वाघांची होत असलेली शिकार, तस्करी, सापळे रचून अथवा विष घालून वाघांना ठार करणे ही कारणे वाघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. तसेच अनेकदा मानव आणि वाघ यांच्यातील संघर्षामुळे वाघाला गोळी घालून ठार केले जाते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वाघांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Leave a Comment