महाराष्ट्रात नाही मिळणार शिवछत्रपतींचा आशीर्वाद : शरद पवार

pawar
चंद्रपूर – आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथल्या राज्य सरकारने तयार केलेल्या शालेय पाठ्यक्रमात छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरी महालात झाला, व त्याचे गुरु त्यांचे आजोबा दादोजी कोंडदेव होते. असे नमूद करण्यात आले असून तो एक प्रकारे जिजाऊ व शिवरायांबद्दल बदनामीकारक मजकूर असून, राजमातेची व महाराजांची अशी बदनामी करकणाèयांना महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा आशीर्वाद कधीच मिळणार नसल्याचे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

जिजाऊंची जन्मभूमी असणार्‍यासिंदखेडराजा येथे राकाँ उमेदवार रेखा खेडेकर यांच्या प्रचारार्थ जिजाऊ सृष्टीवर आयोजित प्रचार सभेत शरद पवारांनी जाहीरातीतून महाराष्ट्राची बदनामी चालविणाèया भाजपला व पाकिस्तानी सैन्य भारतीय सिमांवर हल्ले करून निरपराध नागरिकांचे बळी जात असताना महाराष्ट्रात भाजपाचे आमदार निवडून आणण्यासाठी गावोगावी प्रचारसभा घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुफानी हल्ला चढविला. देशाचे संरक्षण धोक्यात असतांना प्रचारासाठी फिरणार्‍या पंतप्रधानांना संरक्षणमंत्री नेमण्याला वेळ नसल्याची टिका त्यांनी करून गत तीन महिन्यात मोदी सरकारच्या धोरणांनी कृषी अर्थव्यवस्था मोडकळीस निघाल्याचा आरोप त्यांनी केला.