
बगदाद : एका रॉकेटचा स्फोट झाल्याने इराकची राजधानी बगदादच्या जवळ इसिसचे १४ दहशतवादी मारले गेले असून, तर सात दहशतवादी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मारले गेले इसिसचे दहशतवादी
ही घटना बगदादपासून ९० किमी अंतरावरील धुलविया शहरात घडली असून हा अपघात त्यावेळी घडला जेव्हा दहशतवादी रॉकेटमध्ये क्लोरीन गॅस भरत होते. त्यावेळी रॉकेटचा स्फोट झाला आणि यामध्ये आयएसआयएसचे १४ दहशतवादी मारले गेल्याची माहिती इराकच्या सुरक्षा अधिका-याने दिली. सध्या इराक आणि सीरीयामध्ये आयएसआयएसने नरसंहार चालवला असून, दोन अमेरिकी पत्रकारासह एका ब्रिटीश नागरिकाचे शिरकाण या दहशतवाद्यांनी केले आहे.
