युतीसाठी भैय्यूजी महाराज करणार मध्यस्थी ?

bhayuji
मुंबई – जागा वाटपावरुन सध्या शिवसेना आणि भाजपात कमालीचा तणाव निर्माण झाला असून आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज शिवसेना-भाजपातील वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

जागा वाटपाबाबत आपल्या मागणीवर दोन्ही पक्ष ठाम असल्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती टिकेल की तुटेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या वादात आता भैय्यूजी महाराज मध्यस्थी करणार असल्यामुळे आता शिवसेना भाजपात समझोता होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment