
नवी दिल्ली- जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या अव्वल दहामध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधू हिने पुन्हा एकदा स्थान मिळवले असून नुकत्यात कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने कांस्य पदक मिळवले होते. जागतिक स्पर्धेत सलग दुसरे पदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
पुन्हा टॉप टेनमध्ये पी.व्ही.सिंधू
या क्रमवारीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल क्रमवारीत सातव्या स्थानावर तर सिंधू दहाव्या स्थानी आहे.
पुरुषांच्या क्रमवारीत किदांबी श्रीकांत याने आपल्या करीयरमधील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. तो क्रमवारीत २२ स्थानावर आहे. तर जागतिक स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतच पराभव झालेल्या पी.कश्यपच्या क्रमवारीत घसरण झाले आहे. तो २८व्या स्थानी आहे. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी त्यांचे २१वे स्थान कायम राखले आहे.
