करा ऑनलाइन अनाधिकृत बांधकामांची तक्रार

bmc
मुंबई – वाढत्या अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडे यापुढे ऑनलाइन तक्रार करता येणार असून केलेल्या तक्रारीबाबत संबंधित अधिका-यांनी काय पावले उचलली, याची माहितीही ऑनलाइन पाहता येणार आहे.

या प्रणालीद्वारे पालिकेचे सर्व विभाग कार्यालयांच्या इमारत व कारखाना विभाग जोडले जाणार असून ही प्रणाली ‘वेब बेस्ड जीपीएस’वर आधारित असल्यामुळे नागरिकांना मोबाइलवरूनही बेकायदा बांधकामांची तक्रार नोंदवता येणार आहे.

मुंबईत अनाधिकृत बांधकामांना सुळसुळाट झाला असून, वारंवार कारवाई करूनही पुन्हा अशी बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामांच्या नोंदी वेगवेगळी नोंद केली जात असल्याने त्यांच्या एकगठ्ठा नोंदी संबंधित विभाग कार्यालयांमधील इमारत व कारखाने विभागात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकदा बेकायदा बांधकामांवर कारवाईस विलंब होतो.

अशा बांधकामांची एकत्रित माहिती संकलित व्हावी आणि त्यांच्यावर वेळेत कारवाई व्हावी याकरता विभाग कार्यालयांमधील इमारत व कारखाना विभागांचे संगणकीकरण करण्यात येत असून, यासाठी ‘ऑप्युलन्स टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला काम देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिका-याने दिली. सुमारे ७० लाख रुपये याकरता खर्च करण्यात येणार आहेत.

Leave a Comment