VIDEO: याला म्हणतात माणुसकी! मुंबई लोकलखाली आला व्यक्ती, जमावाने ट्रेनला ढकलून वाचवला त्याचा जीव


तुम्ही गाड्या आणि बसला अनेकदा धक्का मारलेले पाहिले असेल, पण कधी ट्रेनला ढकललेले पाहिले आहे का? तुम्ही पाहिले नसेल तर आत्ताच पहा. मग आम्ही तुम्हाला समजावून सांगू काय प्रकरण आहे? सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर वणव्यासारखा वेगाने पसरत आहे. व्हिडिओमध्ये जमाव एकत्र येऊन मुंबई लोकल ट्रेनला ढकलत असताना दिसत आहे. पण जेव्हा तुम्हाला त्यांचे असे करण्यामागचे कारण कळेल, तेव्हा तुम्ही त्यांची स्तुती करताना थकणार नाही.

Person got caught under the train, crowd pushes off the train and pulls them out. [SFW]
byu/Cat_Of_Culture innavimumbai


हा व्हिडिओ मुंबईतील वाशी स्थानकाचा असून, रेल्वेच्या चाकाखाली आलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनलाच धक्का देण्यास सुरुवात केली. ट्रेनमध्ये चढत असताना हा तरुण घसरला आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तेथे उपस्थित जमाव एकवटला आणि माणुसकी दाखवत तरुणाला वाचवू लागला. या आगळ्यावेगळ्या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. रेल्वेच्या क्लोज सर्किट टीव्ही फुटेजवरून समोर आले आहे की, ट्रेनने धडक दिल्यावर हा तरुण दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी उडी मारून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या सुरक्षेसाठी फूट ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सतर्कतेचा इशारा दिला आहे.