शाहीन आफ्रिदीसोबत पर्थमध्ये झाले अनर्थ, वॉर्नरने मारला झोपून षटकार, बनला हा लाजिरवाणा विक्रम


शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पर्थमध्ये त्याची अवस्था बिघडवली. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला. शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानी गोलंदाजीची सुरुवात केली आणि उस्मान ख्वाजाने त्याची पहिल्या षटकापासून अवस्था खराब करुन टाकली. शाहीन पहिल्या षटकात विकेट घेण्यासाठी ओळखला जातो, पण त्याने पर्थमध्ये पहिल्या 6 चेंडूत इतक्या धावा दिल्या की एक लाजिरवाणा विक्रम रचला गेला.

शाहीन आफ्रिदीने पर्थ कसोटीच्या पहिल्याच षटकात 14 धावा दिल्या. वॉर्नरने पहिल्याच चेंडूवर आपले खाते उघडले, पण उस्मान ख्वाजाने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि शाहीनच्या पाचव्या चेंडूवरही चौकार लगावला. ख्वाजाने शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेतल्या आणि आफ्रिदीने पहिल्याच षटकात 14 धावा दिल्या. गेल्या 21 वर्षात असे फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा एखाद्या गोलंदाजाने कसोटीच्या पहिल्या षटकात 14 धावा दिल्या आहेत. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासोबत असे पहिल्यांदाच घडले आहे.


शाहीन आफ्रिदी पर्थमध्ये विचलित लाईन-लेन्थसह गोलंदाजी करताना दिसला. याचा फायदा डेव्हिड वॉर्नरने चांगलाच उचलला. या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने खेळपट्टीवर झोपून शाहीनच्या चेंडूवर षटकार ठोकला. 22व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाहीनने वॉर्नरला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला आणि त्याच्या अंगावर आलेल्या या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने षटकार मारला. चेंडूने फाइन लेगची सीमा ओलांडली. हा षटकार दिल्यानंतर शाहीनला राग आला आणि त्याने हसत-हसत बाऊन्सर मारायला सुरुवात केली. मात्र, वॉर्नरवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने शांतपणे पाकिस्तानी गोलंदाजांना धोपटणे सुरूच ठेवले.

शाहीन हा आजच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज मानला जात असला, तरी कसोटीतील त्याची कामगिरी सरासरी आहे. विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांवरही शाहीनची कामगिरी सरासरी आहे. ऑस्ट्रेलियात शाहीनची गोलंदाजीची सरासरी 38 आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इंग्लंडमध्ये ही सरासरी 50च्या वर आहे आणि न्यूझीलंडमध्ये तो 43.77 च्या सरासरीने गोलंदाजी करतो.