Cheteshwar Pujara : टीम इंडियाने ज्या दिग्गज खेळाडूला संघातून काढून टाकले, त्याला परदेशी संघाने पकडले


टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराला भारतीय कसोटी संघात स्थान मिळत नसले, तरी पण चेतेश्वर पुजाराचा इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा आहे आणि म्हणूनच ससेक्सने 2024 च्या काउंटी चॅम्पियनशिपसाठी चेतेश्वर पुजाराला पुन्हा करारबद्ध केले आहे. चेतेश्वर पुजारा 2024 हंगामातील पहिल्या सात सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

2024 च्या मोसमासाठी ससेक्सने दोन मोठ्या परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे, चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फलंदाज डॅनियल ह्यूजला ससेक्सने सामील केले आहे. चेतेश्वर पुजारा काउंटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सात सामन्यांसाठी उपलब्ध असेल, तर डॅनियल ह्यूज टी-20 ब्लास्ट तसेच काउंटी चॅम्पियनशिपसाठी उपलब्ध असेल.

जर आपण चेतेश्वर पुजाराबद्दल बोललो, तर त्याने ससेक्ससाठी आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 65 च्या सरासरीने 1863 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये 8 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्यात 2022 मध्ये डर्बीशायरविरुद्धच्या 231 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजाराची निवड केलेली नाही. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर पुजाराला टीम इंडियामध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. त्याआधीही तो बराच काळ संघाबाहेर होता.

भारतीय संघ आता बदलाकडे वाटचाल करत आहे, अशा स्थितीत आता ज्येष्ठ खेळाडूंच्या जागी तरुणांना संधी मिळत आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांना संधी दिली जात आहे. त्यामुळेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना संधी मिळत नाहीये. पुजाराच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 71 कसोटीत 7195 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याची सरासरी 44 आहे आणि पुजाराच्या नावावर 19 शतके आहेत.