Health Tips : फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये


आपण जे काही खातो किंवा पितो ते पचवण्याचे काम आपले यकृत करते. एवढेच नाही तर रक्त शुद्ध करण्याचे कामही यकृत करते. यकृत हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण गेल्या काही वर्षात लोकांमध्ये यकृताशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. यापैकी फॅटी लिव्हर हा अतिशय सामान्य आजार म्हणून ओळखला जातो.

फॅटी लिव्हरच्या स्थितीत यकृताभोवती अतिरिक्त चरबी जमा होते. जास्त तेल आणि मसाले खाणे आणि अल्कोहोल पिणे यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. म्हणूनच ही समस्या टाळण्यासाठी आपण काय खावे आणि काय खाऊ नये हे महत्त्वाचे आहे.

फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय खावे?

  • लसूण- संशोधनानुसार, लसूण फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांचे वजन आणि यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते. फॅटी लिव्हरची समस्या टाळण्यासाठी आपल्या आहारात लसणाचा समावेश करा.
  • ग्रीन टी- ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट पेशींची दुरुस्ती करण्यास तसेच वजन कमी करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल आणि यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
  • एवोकॅडो- फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी एवोकॅडो खूप फायदेशीर आहे. संशोधनानुसार, यात एक प्रकारचे रसायन देखील असते, जे यकृत सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

काय खाऊ नये
प्रक्रिया केलेले अन्न-पास्ता, पांढरा तांदूळ आणि पांढरा ब्रेड यासारखे प्रक्रिया केलेले अन्न अत्यंत हानिकारक असतात. परिष्कृत धान्य तयार करण्यासाठी, त्याला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते, ज्या दरम्यान त्यातील फायबर वेगळे केले जाते. हे धान्य फायबर फ्री असताना रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.

साखरेच्या गोष्टी- जास्त साखर असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. दरम्यान साखर वाढल्याने यकृतामध्ये जास्त चरबी जमा होऊ लागते. म्हणूनच कँडी, आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्स यांसारखे खाद्यपदार्थ टाळावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही