Haddi Movie Trailer : हड्डीत ट्रान्सजेंडर बनला नवाजुद्दीन सिद्दीकी, ट्रेलर रिलीज


खोलीच्या भिंतीवर चिकटवलेले डझनभर ट्रान्सजेंडरचे फोटो, लाल साडी नेसलेला आणि हातात धारदार चाकू घेतलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, समोर डोके टेकवून बसलेली एक व्यक्ती आणि जोरदार संवाद. हड्डी चित्रपटाच्या 2.25 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात अशी होते. या चित्रपटाची प्रतीक्षा खूप दिवसांपासून होती. त्याचा फर्स्ट लूक आल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलरसोबतच त्याची रिलीज डेटही समोर आली आहे.

ट्रेलरची सुरुवातच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार संवादाने होते ज्यात तो म्हणतो, “हमारा आशीर्वाद बहुत शक्तिशाली होता है और हमारा श्राप बहुत भयावह, और उससे भी भयावह जानते हो क्या होता है, हमारा बदला.”

नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडर कसा बनतो आणि त्याचे आयुष्य कसे बदलते, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनुराग कश्यप देखील आहे. याशिवाय चित्रपटात मोहम्मद जीशान अयुब आणि इला अरुण सारखे कलाकारही आहेत. अनुराग चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे, तर नवाजुद्दीव हा ट्रान्सजेंडर त्याचा बदला घेताना दिसत आहे.

ट्रेलर खूपच दमदार असून ट्रान्सजेंडर बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. झी स्टुडिओजच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे. संजय साहा आणि राधिका नंदा याचे निर्माते आहेत. या चित्रपटात नवाजुद्दीन आणि अनुराग व्यतिरिक्त मोहम्मद जीशान अयुब, इला अरुण, सौरभ सचदेवा, राजेश कुमार, श्रीधर दुबे आणि सहर्ष शुक्ला हे कलाकार दिसणार आहेत.

अलीकडेच जिओ सिनेमावर ट्रान्सजेंडरवर आधारित ताली ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेत सुष्मिता सेनने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. ही भूमिका गौरी सावंतच्या जीवनातून प्रेरित आहे. सुष्मिताने गौरीची व्यक्तिरेखा दमदारपणे साकारली असून यासाठी तिची खूप प्रशंसा केली जात आहे.