खोटी निघाली हिथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार म्हणाला- मी अजून जिवंत आहे


झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक यांचे निधन झाल्याची बातमी येताच क्रिकेट जगतात भूकंप झाला. पण ही बातमी खोटी निघाली. स्वतः हीथ स्ट्रीकने ही बातमी चुकीची सांगितली असून आपण अजूनही जिवंत असल्याची माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे.

तो जिवंत असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे हीथ स्ट्रीकने सांगितले. दरम्यान हीथ स्ट्रीक कॅन्सरशी झुंज देत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी उशिरा त्याचा सहकारी खेळाडू हेन्री ओलांगा याने ट्विट करून स्ट्रीकचे निधन झाल्याची माहिती दिली होती, पण आता ही बातमी चुकीची ठरली आहे.


हेन्री ओलांगा यांनी आता आपल्या ताज्या ट्विटमध्ये सांगितले आहे की हीथ स्ट्रीक ठीक आहे आणि त्याने आपल्या पोस्टमध्ये हीथ स्ट्रीकशी झालेल्या संभाषणाचा संदेश देखील ट्विट केला आहे.

या चुकीच्या बातमीवर हिथ स्ट्रीकने नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्याने मला खूप दु:ख झाले असून, ही अफवा पसरवणाऱ्यांनी माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान हिथ स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 वनडे खेळले आहेत. स्ट्रीकने कसोटीत 216 विकेट घेतल्या आहेत तर वनडेत 239 विकेट घेतल्या आहेत.