
होळीच्या सणासंदर्भात स्विगी इंस्टामार्टच्या जाहिरातीवरून निर्माण झालेला गोंधळ अजून कमी झाला नव्हता की, भारत मॅट्रिमोनी या विवाहविषयक वेबसाइटच्या व्हिडिओने आगीत तेल ओतले आहे. भारत मॅट्रिमोनीच्या व्हिडिओ जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप नेटिझन्सने केला आहे. सोशल मीडियावर लोक या वेबसाइटला प्रचंड ट्रोल करत आहेत. सोबतच त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीमही राबवली जात आहे. #BoycottBharatMatrimony या हॅशटॅगमुळे ट्विटरवर लोकांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
भारत मॅट्रिमोनीच्या या व्हिडिओवरून सुरु झाला गोंधळ, लोक म्हणाले- ‘जास्त ज्ञान वाटू नका’
See the anti Hindu mindset of @bharatmatrimony
हिन्दू त्यौहारों पर हमला करने वालों की नजर मदरसे व चर्चों में हो रहे व्यभिचारों पर क्यों नहीं जाती..!!#BoycottBharatMatrimony pic.twitter.com/dwDoAoRZCU— विनोद बंसल Vinod Bansal (@vinod_bansal) March 8, 2023
This Women's Day & Holi, let's celebrate by creating safer and more inclusive spaces for women. It's important to acknowledge the challenges that women face in public spaces and create a society that truly respects their well-being – today & forever.#BharatMatrimony #BeChoosy pic.twitter.com/9bqIXZqaXu
— Bharatmatrimony.com (@bharatmatrimony) March 8, 2023
भारत मॅट्रिमोनीने होळी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये दावा केला आहे की, अनेक महिलांनी या दिवशी छेडछाड झाल्यामुळे होळी खेळणे बंद केले आहे. ‘महिला दिन’ साजरा करण्याचे आवाहन करत त्यांनी लिहिले, चला साजरा करूया महिला दिन आणि रोज सुरक्षित वाटते. हे ट्विट लोकांच्या नजरेस पडल्यावर त्यांचा पारा चढला. वेबसाइटवर होळीच्या विरोधात जाहिरात देऊन हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी भारत मॅट्रिमोनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, गदारोळ पाहून वेबसाइटने ट्विट डिलीट केले. पण त्याचा स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jih@di Bharat Matrimony. #BoycottBharatMatrimony pic.twitter.com/GXV7SJWuBD
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) March 8, 2023
#BharatMatrimony ने #Holi की आड में नारी हिंसा पर हिन्दुओं को बांटा ज्ञान !
भारत में रहकर BharatMatrimony ने Money के लिए भारतीयों की भावनाओं से खिलवाड किया है !
खेलना है तो रंगों से खेलो, भारतीयों की भावनाओं से नहीं !
BharatMatrimony माफी मांगो !
https://t.co/wWXzcZBlcK pic.twitter.com/zdyxr6xi3b— Umesh Zodge (@ZodgeUmesh) March 9, 2023
याला हिंदुविरोधी मानसिकता असल्याचे सांगून विहिंपचे नेते विनोद बन्सल यांनी हिंदू सणांवर हल्ले करणारे मदरसे आणि चर्चमध्ये होणाऱ्या व्यभिचाराकडे का लक्ष देत नाहीत, असा सवाल केला आहे..!! त्याचवेळी इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी वेबसाईटचे एक जुने ट्विट शेअर केले असून याला जिहादी म्हटले आहे.
याआधी स्विगी इंस्टामार्टच्या एका जाहिरातीवरून बराच गदारोळ झाला होता. होळीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये अंडी हा जीवनावश्यक खाद्यपदार्थ असल्याचे सांगून ते डोक्यावर फोडून वाया घालवू नका, असे सांगण्यात आले होते. यानंतर नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला.
