
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंदूरला पोहोचला आहे. तिसरा सामना 1 मार्चपासून येथील होळकर स्टेडियमवर सुरू होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. सध्या भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पुढे आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आणि दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला. यानंतर आता तिसर्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी सोमवारी संघाचा मुख्य फलंदाज विराट कोहली प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला.
विराट मास्तरांची विशेष शाळा, टीम इंडियाला गुडघ्यावर बसून करायला लावला सराव
या मालिकेत कोहलीला अद्याप फलंदाजीची ताकद दाखवता आलेली नाही. या फलंदाजाने आतापर्यंत दोन सामन्यांच्या तीन डावात एकूण 76 धावा केल्या आहेत. कोहलीने टी-20 आणि वनडेमधला शतकाचा दुष्काळ संपवला आहे, पण कसोटीत त्याच्या बॅटमधून बरेच दिवस शतक झालेले नाही.
Fun times in the field ft. @imVkohli 🙂 💪#TeamIndia sharpen their catching skills ahead of the 3rd #INDvAUS Test in Indore. 👍 👍@mastercardindia pic.twitter.com/6VtHfBBbLt
— BCCI (@BCCI) February 27, 2023
या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. सोमवारीही संघाने सराव केला आणि यावेळी कोहली एका खास भूमिकेत दिसला. कोहलीने कोचिंगची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोहली गुडघ्यावर बसून संघातील खेळाडूंना स्लिपमध्ये झेल टिपण्याचा सराव करत आहे. दरम्यान, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करत होते. मात्र, यादरम्यान हे सर्व खेळाडू मस्ती करताना देखील दिसले.
भारताच्या गेल्या दोन सामन्यांमध्ये स्लिप कॅचिंग फार काही खास राहिले नाही. दोन्ही सामन्यांमध्ये स्लिपमध्ये उभे असताना कोहलीने स्वत: फिरकीपटूंचे झेल सोडले. आता इंदूर कसोटीत टीम इंडियाची स्लिप कॅचिंग काय होते हे पाहावे लागेल.
या सगळ्यामध्ये इंदूरच्या स्टेडियमच्या खेळपट्टीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना मदत झाली. पण इंदूरची खेळपट्टी लाल मातीची असल्याचं म्हटलं जातं ज्यावर अतिरिक्त उसळी मिळू शकते. अशा परिस्थितीत ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. पण ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल हे नाकारता येणार नाही. भारतीय खेळपट्ट्या कशाही असल्या तरी बहुतांश खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना मदत मिळते.
