
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी नुकताच राधिका मर्चंटसोबत केलेल्या लग्नासाठी चर्चेत आले. आता त्याच्या एका नवीन व्हिडिओने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये तो एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये साजरा करताना दिसत आहे. अनंत अंबानीचे औदार्य लोकांना आवडले आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Viral Video : अनंत अंबानीने साजरा केला कर्मचाऱ्याचा वाढदिवस, खाजगी जेटमधून फिरवले
अनंत अंबानींचा हा व्हायरल व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अंबानींचा मुलगा अनंत निळ्या शर्टमध्ये आपल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एवढेच नाही तर ते स्वत:च्या हाताने कर्मचाऱ्याला केकही खाऊ घालतात. व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनंतने कर्मचाऱ्याचा खास दिवस त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये साजरा केला आणि तो आणखी अविस्मरणीय बनवला. कर्मचाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एखादं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करत असेल तेव्हा त्यांच्या भावनांना कोणी रोखू शकणार नाही, हे उघड आहे.
व्हिडिओमध्ये अनंत कर्मचाऱ्याला वाढदिवसाचा केक कापण्यात मदत करताना दिसत आहे. मात्र, यानंतर कर्मचाऱ्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने अनंतच्या पायाला स्पर्श केला, ज्यावर अनंत थोडा अस्वस्थ दिसत होता. काही सेकंदांची ही क्लिप patialapolitics नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.
अनंत अंबानी यांनी उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटसोबत एंगेजमेंट केली होती. वीरेन हे Encore Healthcare Pvt. Ltd चे CEO आणि उपाध्यक्ष आहेत. राधिका आणि अनंत शाळेत भेटले आणि रिलेशनशिपमध्ये होते. राधिका प्रशिक्षित नृत्यांगना आहे. तो न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे, तर अनंतने ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
