
अखंडा हा चित्रपट 2021 साली तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आणि आता त्याच्या रिलीजच्या एका वर्षांहून अधिक कालावधीनंतर, तो पुन्हा चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज झाला आहे, पण हिंदीत. ‘अखंडा’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. याच कारणामुळे आता निर्माते हा चित्रपट हिंदीतही आणत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही साऊथचे चित्रपट आणि नंदामुरी बालकृष्णाचे चाहते असाल आणि भाषेमुळे हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा हा चित्रपट पाहण्याची संधी मिळत आहे.
आणखी एक साऊथ चित्रपट थिएटरमध्ये धूमाकुळ घालण्यासाठी सज्ज, हिंदीत रिलीज झाला ‘अखंडा’चा ट्रेलर
‘अखंडा’ हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्याची कथा आणि नंदामुरी बालकृष्ण यांच्या जबरदस्त अॅक्शन आणि स्फोटक संवादांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हीही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक व्हाल.
पठाणच्या आधी चित्रपटगृहात धडकणार ‘अखंडा’
‘अखंडा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बोयापती श्रीनू आणि नंदामुरी बालकृष्ण यांनी केले आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 130 कोटी होते. त्याच्या हिंदी रिलीजची जबाबदारी डॉ. जयंतीलाल गडा आणि साजिद कुरेशी यांनी घेतली आहे. अखंडाची स्पर्धा शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि अर्जुन कपूरचा ‘कुत्ते’ या दोन हिंदी चित्रपटांशी होणार आहे. अखंडा हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, तर ‘कुत्ते’ 13 जानेवारीला आणि पठाण 25 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
