व्हॉट्सअॅपने जाहीर केले मोठे फीचर, इंटरनेट बंदी असतानाही पाठवता येणार मेसेज


मेटाच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने एक नवीन आणि सर्वात खास वैशिष्ट्य जाहीर केले आहे. मेटाने व्हॉट्सअॅपमध्ये प्रॉक्सी सपोर्टची घोषणा केली आहे, त्यानंतर जगभरातील व्हॉट्सअॅप वापरकर्ते इंटरनेट बंदी किंवा ब्लॉक झाल्यासही व्हॉट्सअॅप वापरू शकतील, पण या वैशिष्ट्यावर सरकारकडून आक्षेप असू शकतात, कारण हे वैशिष्ट्य इंटरनेट बंदी असतानाही मदत करेल. यामुळे, सरकारने इंटरनेट बंद केल्यावरही वापरकर्ते संदेश पाठवू शकतील.

कसे काम करेल WhatsApp चे प्रॉक्सी फीचर ?
प्रॉक्सी फीचरद्वारे, व्हॉट्सअॅप वापरकर्ते अॅपला एखाद्या संस्थेशी किंवा स्वयंसेवकांच्या सर्व्हरशी कनेक्ट करून संदेश पाठविण्यास सक्षम असतील. अशा परिस्थितीत, कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या सक्रिय इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी यूजर्सला कोणत्याही प्रकारचे पेमेंट करावे लागणार नाही. प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट झाल्यानंतर युजर्सची गोपनीयता अबाधित राहील आणि सुरक्षेबाबत काळजी करण्याची गरज नाही, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. प्रॉक्सी सर्व्हरवरही WhatsApp एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. व्हॉट्सअॅपने प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट करण्यासाठी एक चार्टही शेअर केला आहे.

सहसा, दंगल किंवा गोंधळाच्या वेळी, सोशल मीडिया अॅप्स सरकारद्वारे अवरोधित केले जातात आणि काहीवेळा काही भागात इंटरनेट सेवा देखील बंद केली जाते. गेल्या वर्षी, इराण सरकारने निषेधादरम्यान व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम ब्लॉक केले होते. आम्हाला कोणत्याही प्रकारचे इंटरनेट बंद नको आहे, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.

कशी चालू करावी प्रॉक्सी सेटिंग
यासाठी सर्वप्रथम तुमचे व्हॉट्स अॅप अपडेट करा. त्यानंतर अॅपच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर स्टोरेज आणि डेटाच्या पर्यायावर टॅप करा आणि प्रॉक्सी निवडा. आता प्रॉक्सी पत्ता भरा आणि सेव्ह करा. एकदा कनेक्ट झाल्यानंतर, एक चेकमार्क दिसेल आणि इंटरनेट बंद असतानाही तुम्ही संदेश पाठवू शकाल.