Viral Video : या व्यक्तीला बाथरूममध्ये दिसले असे दृश्य, उडाली रात्रीची झोप, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


नवी दिल्ली – सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर कोणाच्या अंगावर शहारे उभे राहतात, तर काही असे व्हिडिओ आहेत, जे पाहून लोक हसून हसून हैराण होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. तसेच कोणत्याही खोलीत किंवा बाथरूममध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला भीती वाटेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे ते जाणून घेऊया?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भल्याभल्यांचे मन थरथरत आहे. मनात भीती निर्माण करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक बाथरूम दिसत आहे, ज्यामध्ये टॉयलेट सीट दिसत आहे. हे बाथरूम अगदी साधे आणि इतर बाथरूमसारखे दिसते.

पण तुमची नजर वरच्या दिशेने जाताच तुम्हाला देखील नक्कीच भिती वाटेल. या व्हिडिओमध्ये सर्वत्र सरडा दिसत आहे. प्रत्यक्षात बाथरूमच्या भिंतींवर शेकडो सरडे चिकटलेले दिसतात. हे दृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात भीती निर्माण होईल.

येथे व्हिडिओ पहा…


हा धडकी भरवणारा व्हिडीओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. भिंतींवर सर्वत्र सरड्यांचा थवा दिसू शकतो. हे बाथरूम नसून जंगल आहे असे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होत आहे.

हा व्हिडिओ RVCJ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, कल्पना करा की तुम्ही रात्री बाथरूममध्ये जाता आणि तुम्हाला असे काही दिसते. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे एका यूजरने लिहिले आहे.