महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप, जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप जाहीर केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकासाची धुरा सांभाळणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या 18 मंत्र्यांना मिळालेली खाती पुढीलप्रमाणे आहेत.

  • सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वनीकरण, सांस्कृतिक उपक्रम आणि मत्स्यव्यवसाय
  • चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज
  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  • गिरीश महाजन- ग्रामविकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे – बंदर आणि खाणी
  • संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे – कामगार
  • संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत – उद्योग
  • तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता), अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार – कृषि
  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण आणि मराठी भाषा
  • अतुल सावे – सहकारी, इतर मागासवर्गीय आणि बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकास