Brahmastra Trailer : प्रतीक्षा संपली! रिलीज झाला ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलरमध्ये, रणबीर कपूरची दिसून आली पूर्णपणे वेगळी शैली


अयान मुखर्जी दिग्दर्शित पौराणिक कथांवर आधारित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ 2014 मध्ये जाहीर झाला होता. तेव्हापासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, हा चित्रपट अखेर 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे.