‘या’ तक्रारींच्या निवारणासाठी ठरतात झोपण्याच्या काही विशिष्ट स्थिती सहायक

sleeping
रात्री झोपताना प्रत्येकाची स्थिती, म्हणजेच ‘sleeping position’ निराळी असते. पण यामध्येही काही झोपण्याच्या स्थिती अशा आहेत, ज्यामुळे काही तक्रारींचे निवारण होण्यास मदत होते. या झोपण्याच्या स्थितींमुळे पाठदुखी, पायदुखी सारख्या तक्रारी दूर होऊन वेदनेपासून आराम मिळतो. ज्यांना पाठदुखीचा त्रास सतावत असेल, त्यांनी केवळ मानेखाली उशी न घेता, पाठीवर झोपून ,एक उशी मानेखाली आणि एक उशी पाठीखाली ठेवावी. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना आधार मिळून वेदना शमण्यास मदत होते. तसेच मान दुखत असल्यास एका कुशीवर उशी न घेता झोपावे. उशीविना झोपणे शक्य नसेल, तर अगदी पातळ उशी मानेखाली घ्यावी.
sleeping1
अनेकदा मसालेदार, तेलकट अन्न सेवन केल्याने छातीमध्ये जळजळ जाणवते. अशा वेळी बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेल्या ऑर्थोपेडिक उशीचा वापर करून डाव्या कुशीवर झोपावे. अनेकदा जास्त वेळ उभे राहावे लागल्याने किंवा खूप अंतर चालल्यामुळे किंवा धावल्याने पायामध्ये गोळे येतात आणि पाय जड झाल्याप्रमाणे भावना होते. अशा वेळी पाठीवर झोपून मानेबरोबरच पायांच्या घोट्याच्या खाली आणखी एक उशी घ्यावी. असे केल्याने पायांचा जडावलेपणा कमी होण्यास मदत होईल.
sleeping2
सर्दीमुळे नाक सतत वाहत असल्यास मानेखाली एक उशी घेऊन कुशीवर न झोपता पाठीवर झोपावे आणि अनेक उश्या डोक्याखाली घेऊन त्यांना टेकून झोपावे. याने नाक वाहत वाहणे कमी होते आणि नाक बंदही होत नाही. ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, किंवा ज्यांचा रक्तदाब काही कारणाने अचानक वाढला असेल, त्यांनी झोपण्यासाठी पातळ आणि मऊ उशीचा वापर करून, पोटावर झोपावे. अचानक उद्भविलेली डोकेदुखी कमी करण्यासाठी पाठीवर झोपावे आणि डोक्याच्या अवती भोवती आणखी दोन तीन उश्या रचून ठेवाव्यात. जशी शारीरिक समस्या असेल, त्याप्रमाणे झोपण्याची स्थिती निवडल्यास समस्येचे निवारण होण्यास मदत होते. पण हे उपाय तात्पुरते असून, आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment