नेमके काय आहे ‘कीटो डायट’?

keto
वजन घटविण्यासाठी लोक डायटिंग, म्हणजेच आहार पद्धतीमध्ये बदल करण्याचा पर्याय निवडतात. हे योग्यही आहे, कारण वजन घटविण्यासाठी सत्तर टक्के आहारनियम आणि उर्वरित तीस टक्के व्यायाम असे समीकरण आहारतज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे केवळ भरपूर व्यायाम करूनही जर आहारावर नियंत्रण नसेल, तर वजन घटविण्याच्या प्रयत्नांना यश येत नाही. हे वास्तव आता सर्वमान्य असल्यामुळे वजन घटविण्यासाठी आता आहारावर जास्त लक्ष दिले जाऊ लागले आहे. त्यासाठी निरनिरळ्या आहारपद्धती किंवा डायट अवलंबली जात असतात. या अनेकविध आहारपद्धतींपैकी सध्याच्या काळामध्ये कीटो, किंवा कीटोजेनिक डायट विशेष लोकप्रिय ठरत आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.
keto1
कीटोजेनिक आहारपद्धतीमध्ये कर्बोदकांचे सेवन अतिशय कमी असून, यामध्ये स्निग्ध पदार्थांचे, म्हणजे फॅटस् चे सेवन अधिक आहे. येथे स्निग्ध पदार्थांचा अर्थ ‘तळलेले किंवा तेलकट, तुपकट पदार्थ’ असा नसून, ज्यामध्ये नैसर्गिक फॅटस् आहेत असे पदार्थ, असा आहे. तसेच शरीराला आवश्यक तेवढी प्रथिने देखील या आहारपद्धतीच्या अंतर्गत सेवन करायची आहेत. या डायटमुळे शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक असून, या स्निध पदार्थांचे चयापचय होत असताना ‘कीटोन्स’ नामक कंपाउंड तयार होत असतात. शरीराला सक्रीय राहण्याकरिता जी उर्जा आवश्यक आहे ती या कीटोन्स कडून मिळत असते. थोडक्यात सांगायचे झाले, तर शरीराला सक्रीय ठेवण्यासाठी जी उर्जा आवश्यक असते, ती शरीरातील कीटोन्स मधून घेतली जात असल्याने या आहारपद्धतीच्या अवलंबामुळे कॅलरीज वेगाने खर्च होतात.
keto2
या आहारपध्दतीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ब्लड शुगर लेव्हल्स मध्ये वाढ होत नाही, आणि त्या नियंत्रित राहतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी ही आहार पद्धत लाभकारी आहे. या आहारपद्धतीमुळे ट्रायग्लिसराईड्स आणि एलडीएल कोलेस्टेरोलची पातळी कमी होत असून, एचडीएल (good cholesterol) ची पातळी वाढते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी देखील हे डायट चांगला पर्याय आहे. तसेच या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश जास्त असल्याने भूक लवकर शमून, वारंवार भूक लागणे, किंवा एखादा पदार्थ, विशेषतः गोड पदार्थ सतत खावासा वाटणे ( cravings ) अश्या प्रकारच्या भावना कमी होऊ लागतात.
keto3
या आहार पद्धतीमध्ये सागरी खाद्य (sea foods), म्हणजेच मासे समाविष्ट केले जातात. यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असून, प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तसेच शरीराला आवश्यक अश्या ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्सचे प्रमाणही यामध्ये मुबलक आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनवेळा मासे कीटो डायटमध्ये समाविष्ट केले जावेत. मांसाहारी व्यक्तींना माश्यांच्या जोडीने चिकन व अंडी आहारामध्ये समाविष्ट करता येतील. क जीवनसत्व आणि क्षार असलेल्या भाज्या व फळे या आहार पद्धतीमध्ये समाविष्ट करायची आहेत. यामध्ये ताजा पालक, ब्रोकोली, फ्लॉवर, अॅव्होकाडो, दही, पनीर, सुका मेवा, वेगवेगळ्या बिया (सूर्यफूल, भोपळा, अळशी, चिया सीड्स) इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त घरचे ताजे लोणी, साखर आणि दुध विरहित चहा/कॉफी, चीझ या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment