पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेनंतर रोममध्ये घेणार पोप फ्रान्सिस यांची भेट


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी दौऱ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. रोम आणि ग्लासगोला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी रोममध्ये असतील.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर पंतप्रधान मोदी जाणार आहेत. ते जिथे १६ व्या जी-२० शिखर परिषद आणि सीओपी-२६ च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. २९-३१ ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान रोममध्ये असतील, ते जिथे जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. जी-२० शिखर परिषद साथीच्या रोगातून पुनर्प्राप्ती, जागतिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे, आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदल, शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षा यावर आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील. पण, ही चर्चा शिष्टमंडळ पातळीवर होणार की एकट्याने होणार हे अद्याप ठरले नसल्याचे असे हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले.