जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा मॅचोमॅन अर्थात अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सत्यमेव जयते २ येणार आहे. नुकताच सत्यमेव जयते २ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आणि अॅक्शनने भरलेला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जॉनने सत्यमेव जयते २ चा ट्रेलर शेअर केला आहे. जॉन या ट्रेलरमध्ये ३ भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहे. भारतमातेचे हे तीन वाघ, मिटवणार भ्रष्टाचार! ट्रेलर रिलीज, जॉनने असे कॅप्शन हा ट्रेलर शेअर करत दिले आहे.


जॉन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला अग्रेसिव्ह दिसतो. त्याचे एक-एक दमदार डायलॉग बोलत, तो फाइट करताना दिसतो. तर जॉन दुसऱ्या सीनमध्ये कुर्ता आणि पायजम्यात असेंबलीमध्ये जात असल्याचे दिसते. त्यानंतर दिव्या खोसला कुमारची एण्ट्री होते. यानंतर जॉन एका पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतो. त्याचबरोबर यात नोरा फतेहीचा एक आयटम नंबर देखील आहे. जॉन चित्रपटात तीन भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मिलन जावेरी यांनी केले आहे. तसेच चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. २६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.