‘भूल भुलैया २’च्या नव्या पोस्टरवर कार्तिक आर्यनचा हटके अंदाज


महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. चित्रपटगृहे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. पण काही निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला. ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २५ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. कार्तिकने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कार्तिकने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमधील कार्तिकचा लूक सध्या चर्चेत आहे. त्याने काळा चष्मा लावला आहे, हातात माळ घेतली आहे आणि हटके टी-शर्ट परिधान केला आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत, २५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

२००७मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भलैयाचा ‘भूल भुलैया २’ हा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहूजा हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आता कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मूख्य भूमिकेत दिसणार आहेत.