ठाकरे सरकार प्रभाग पद्धतीच्या निर्णयावर ठाम


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात येईल, अशी शक्यता होती. पण, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहितीसमोर आली आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते.

महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत. महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने काहीशी आक्रमक भूमिकाही घेतली होती, पण प्रभाग रचनेत कोणतेही बदल न करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कायम आहे. त्यामुळे महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, तीन प्रभाग रचनेबद्दलचा निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर नक्कीच तोडगा काढतील. प्रभाग 3 चा असावा की 2 चा असावा हे मुख्यमंत्रीच ठरवतील, कॅबिनेटमध्येच प्रभाग निश्चितीवर अंतिम निर्णय होईल.

यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारमधील काही घटकांनी वेगळी मते नोंदवली. त्यावर सीएम सर्वमान्य तोडगा काढतील, आमच्यात कोणतेही वाद नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले होते. पण, हा निर्णय आता कायम राहणार आहे.