जनाब संजय राऊत एमआयएम की मुहब्बत कौन है?; पडळकरांचा टोला


मुंबई – तुम्ही ओवेसीला आलिंगन घालून मालेगाव व अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा पेश केला होता. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’हे महाराष्ट्राला माहितीये. महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि कोलांट्या उड्या मारता. हे रोजच मनोरंजन बंद करा, अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

कदाचित जनाब संजय राऊत हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीमुळेच निवडून आले हे विसरले असतील. त्यांनी ओवेसीची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवेसींनी अलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा यांनी पेश केला. एवढेच काय अमरावतीमध्ये देखील यांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. आता जनाब संजय राऊत एमआयएम की मुहब्बत कौन है? हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची आवश्यकता नसल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.


तसेच, योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगी पाहून घेतील. कारण, ते सक्षम नेते आहेत. परंतु महाराष्ट्रात हिंदुंना शिव्या घालणाऱ्या शर्जिल उस्मानी सारख्यावर कारवाई करायला. तुमच्यात हिंमत नाही, अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे देखील पडळकर यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, महाविकासआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि त्यांना खूश करण्यासाठी तुम्ही कोलांट उड्या मारतात. त्याचं मनोरंजन करतात. या मनोरंजनाची महाराष्ट्रातील लोकांनी किळस आलेली आहे. हा मनोरंजनाचा खेळ तुम्ही बंद करा. जय हिंद, जय मल्हार…असे पडळकर यांनी बोलून दाखवले आहे.