शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक!


नागपूर – शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे समोर आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या फेसबुक वॉलवर “ ‘Turkish Army’ , ‘FELONY & CASTRO HACKED BY TURKISH SECURITY ARMY’ , Castro , FELONY & CASTRO VURDU, MY NAME IS FELONY HACKER ABE HACKER ” असे काही मेसेज दिसत असल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.

दिवसेंदिवस राजकीय नेत्यांचे सोशल माडिया अकाउंट हॅक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागपुरमधील रामटेक येथील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट आता हॅक झाल्याचे समोर आले आहे. नागपूर सायबर सेलकडे या संदर्भात खासदार तुमाने यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

सामान्य जनतेचे ऑनलाईन फसवणूक होणे हे आता जवळपास नित्याचेच झाले आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसून येतात. पण आता एका खासदाराचेच सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यामुळे, सर्वसामान्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, खासदार तुमाने यांच्या तक्रारीनंतर सायबर विभाग याबाबतच्या कामाला लागला आहे.