नागपूर पाटबंधारे विभागात ‘या’ पदांसाठी होणार पदभरती


नागपूर: नागपूर पाटबंधारे विभागात काही जागांसाठी लवकरच नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती वकील या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

ही नियुक्ती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत वकिलांच्या नियुक्तीबाबत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, सिंचनभवन, नागपूर कार्यालयाकडुन नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या जिल्हयामधील विविध दिवाणी न्यायालयामधील तसेच मोटार अपघात न्यायाधिकरण, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण नागपूर, महाराष्ट्र भुमिसंपादन, पुर्नवसन आणि पुर्नस्थापना प्राधिकरण नागपूर, व उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ समोरील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी करण्यात येत आहे.

या पदांसाठी भरती

  • वकील

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • या पदभरतीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाशी कायद्याचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार वकिलीचा अभ्यास करत असावा. उमेदवारांना सिव्हिल, क्रिमिनल, लेबर आणि इंडस्ट्रियल विभागातील प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराने बारद्वारे जारी केलेल्या सराव कालावधीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सध्याच्या पॅनलवरील उमेदवारांनीही नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य असणार आहे.

या ठिकाणी असणार नोकरी

  • नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोकरीचे ठिकाण राहणार आहे. यासाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी – [email protected]

निवड प्रक्रिया

  • या पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची वेळ आणि पत्ता उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात आल्यानंतर कळवण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा