पाकिस्तानचा हा धर्मगुरू नवरीप्रमाणे तयार होऊन लोकांना देतो ज्ञान


सोशल मीडियावर दररोज एखादा व्हिडीओ व्हायरल होत असतो. हे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित तरी होतो अथवा जोरजोरात हसतो. असाच पाकिस्तानी धर्मगुरूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या धर्मगुरूचा शिक्षा देण्याचा अंदाज देखील हटके आहे.

हा धर्मगुरू सिंध प्रातांतील हैद्राबाद शहरातील आहे. हा धर्मगुरू नवरीप्रमाणे कपडे घालतो. वेगळ्या रंगाची लांब दाढी असलेल्या या धर्मगुरूच्या आजूबाजूचे वातावरण देखील वराती सारखेच असते. नवरीप्रमाणे कपडे घातलेला हा धर्मगुरू लोकांना इस्लामची शिकवण देतो.

https://twitter.com/ShahidQuetta/status/1019495001380843520

नारंगी रंगाची कपडे घातलेल्या या धर्मगुरूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसते की, नवरी बनलेला हा धर्मगुरू एका मंचावर आरामशीर बसलेला आहे आणि आजुबाजूला असलेले लोक नाचत आहेत, पैसे उडवत आहेत. सोशल मीडियावर लोक या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

या धर्मगुरूबद्दल जास्त माहिती कोणालाच नाही. नवरीच्या वेशातील या धर्मगुरूला रावळपिंडीतील गल्ल्यांमध्ये अनेक वेळा पाहिल्याचे सांगितले जाते.

सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, यावरून एकच दिसते की, लोकांकडे ज्ञानाची कमी आहे.

Leave a Comment