दक्षिण भारतातील लोक कर बरे जेवत असतील केळीच्या पानावर ?


आपल्या देशात अनेक राज्य आहेत आणि त्या राज्यांच्या आपल्या अनेक वेगवेगळ्या अशा पद्धती आहे. त्यातीलच एक परंपरा दक्षिण भारतात आहे. जी म्हणजे केळीच्या पानावर जेवण करण्याची आहे. पण ही परंपरा का बरी अशी असेल या मागील कारण कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? तर आज आम्ही तुम्हाला ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या प्राचीन परंपरेशी निगडित कारण सांगणार आहोत.

दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानावर जेवण करण्यामुळे आपल्या स्वास्थ्याला खूप लाभ मिळतो. केळीला हिंदुधर्मीयांमध्ये पवित्र आणि पूज्य झाड मानले जाते. मंडपदेखील केळीच्या पानापासून बनवले जातात. या पानांचे भगवान सत्यनारायणच्या कथेमध्ये विशेष महत्व आहे. वास्तुनुसार केळीचे झाड तर घरामध्ये किंवा घरासमोर असेल. तर घराचे अनेक दोष दूर होऊ शकतात.

गरम जेवण केळीच्या पानावर वाढले जाते. ज्यामुळे पानांवर असलेले पोषक तत्व जेवणात उतरतात. केळीच्या पानात असलेले तत्व स्वास्थ्यला लाभदायक असतात. केळीच्या पानावर रोज जेवण केल्याने केस स्वस्थ राहतात. चेहऱ्यावरील पुरळ फोड दूर होतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर राहतात. अनेक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट केळीच्या पानांमध्ये असतात, जे पालेभाज्यांमध्ये असतात. केळी खाल्याने जो फायदा होतो, तोच फायदा केळीच्या पानांवर जेवल्यानेही मिळतो.

आपल्या स्वास्थ्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये ठेवलेले अन्न चांगले नसते. साबणासारख्या केमिकलचा उपयोग धातूंच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठीही केला जातो. आपल्या स्वास्थ्यासाठी हे केमिकलदेखील नुकसानदायकच असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment