
पुणे : इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ सध्या देशात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यासाठी पेट्रोल डिझेलचे वाढते दरही कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. आता अनेकांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढत असल्यामुळे कंपन्याही मोठ्या प्रमाणात यात आता उतरताना दिसत आहेत. दरम्यान, इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आवरता आला नाही. बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची अजित पवार यांनी ट्रायल घेतली. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक रिक्षा चालवली.
अजित पवारांना आवरता आला नाही ई-रिक्शा चालवण्याचा मोह
जेंव्हा अजित दादा रिक्षा चालवतात…@AjitPawarSpeaks #Ajitpawar pic.twitter.com/JvCFVqytzR
— The Publitics (@ThePublitics) August 28, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी बारामती दौरा होता. त्यांनी यावेळी पियाजिओ कंपनीला भेट दिली. यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांना इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याचे कुतहूल देखील पडले. या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची यावेळी त्यांनी चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहने पर्यावरण संरक्षणासाठी सोयीस्कर असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले.
