अखेर स्पायडरमॅन’ सापडला! या कोळीचा चेहरा आहे माणसांप्रमाणे


सोशल मीडियावर सध्या एका कोळी जोरदार व्हायरल होत आहे. हा कोळी बघून लोकांना भिती वाटत आहे. कारण या कोळीचा चेहरा हा माणसासारखा आहे. हा कोळी चीनमध्ये दिसला असून, कोळीचे डोळे आणि चेहरा मनुष्यासारखा दिसत आहे. सध्या हा कोळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

पिप्लस डेली चायना यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, स्पायडरमॅन सापडला आहे. चीनच्या हुआनमध्ये कोळीला माणसांच्या चेहऱ्यात पाहण्यात आले आहे. तुम्हाला याची प्रजाती माहित आहे का तुम्ही व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाच्या कोळीला पाहू शकता. त्याचा चेहरा एकदम माणसांसारखा दिसत आहे.

कोळीला हुआनच्या युआनजियांग शहरामध्ये झाडावर चालताना पाहिले. या कोळीला ली नावाच्या महिलेने शोधले आहे. महिलेने सांगितले की, कोळीच्या पाठीवरील काळी रेष मनुष्याच्या केसांशी जुळतात.

ट्विटरवर कोणी या कोळीला Venom म्हणत आहे तर कोणी घाबरत आहे. लोकांमध्ये या कोळीबद्दल मोठ्याप्रमाणात कुतूहल पाहायला मिळत आहे.

Leave a Comment