नूडल्स किंवा चाऊमिन हे तुमच्या आरोग्यसाठी घातक


सकाळ असो वा संध्याकाळ किंवा मग दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण नूडल्स हा लहान किंवा मोठी असो यापैकी बऱ्याच लोकांचा आवडता मेन्यू असतो. पण तज्ज्ञांच्या मते, नूडल्स किंवा चाऊमिन हे तुमच्या आरोग्यसाठी घातक असते.

खरे तर प्रिक्रिया केलेले नूडल्स हे अन्न असते. कमी फायबर आणि प्रथिने त्यात असली तरी त्याला हेल्दी फुड म्हणता येत नाही कारण नूडल्स सतत खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो.

जर आपण एका आठवड्यातून 2-3 किंवा त्याहून जास्त वेळा नूडल्स खात असू तर त्याचा परिणाम आपल्या पचनशक्ती वर होतो, असे संशोधनातून दिसून आले.

आपल्या शरीराला चाऊमिन किंवा नूडल्समध्ये वापरले जाणारे फ्लेवर हे सर्वाधिक घातक असतात. हे फ्लेवर अनेक प्रक्रिया करून बनवले जातात. तसेच ते टिकून रहावेत यासाठी त्यावर आणखी प्रक्रिया केले जातात. ज्यामुळे तुमचे वजन वाढते.

फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण नूडल्समध्ये खूप असते. तसेच नूडल्स बनवताना त्यात हलक्या दर्जाचे तेल, शुगर सिरप, स्वादसाठी वापरले जाणारे पदार्थ आणि असे इतर अनेक पदार्थ असतात. जे शरीरासाठी घातक असतात. तसेत त्यात असलेले monosodium glutamate तुमच्या शरीरावर परिणाम करते. यामुळे रक्तदाब, डोकेदुखी, श्वसनाचे आजार, स्थूलत्व यासारखे आजार होतात.

अधिक प्रमाणात लहान मुलांनी चाऊमिन आणि नूडल्स खाल्ल्याने इतर पदार्थांमधील पोषक तत्वांचा वापर करण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे त्यांना कुपोषणाचा आजार होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment