तब्बल 137 वर्षांपासून सुरू आहे या चर्चचे बांधकाम


स्पेनच्या ‘ला सग्रादा फॅमिलिया चर्च’चे मागील 137 वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. या चर्चाला बनवण्याचे काम 1882 पासून सुरू आहे. सांगण्यात येत आहे की, हे चर्च 2026 मध्ये बांधून पुर्ण होईल. मात्र तरीही दरवर्षी 40 लाख पर्यटक हे चर्च बघायला येतात.

स्पेनचे सर्वाधिक प्रसिध्द ठिकाण असण्याबरोबरच बार्सिलोनातील सर्वात मोठे बांधकाम सुरू असणारे रोमन कॅथिलिक चर्च आहे. हे स्पॅनिश आर्किटेक्ट एंटोनी गौदीने तयार केलेल्या प्रोजेक्ट मॅपनुसार तयार करण्यात येणार आहे. बनल्यानंतर हे जगातील सर्वात उंच चर्च असेल. स्पेनच्या मीडियानुसार, याची लांबी 295 फुट, रूंदी 196 फुट आणि उंची 564 फुट असू शकते.

चर्चच्या वरील भागाचे काम सुरू –
याचे निर्माण करण्यासाठी लागेला वेळ ताजमहाल (20 वर्ष) आणि गाजी के पिरामिड (30 वर्ष ) बनवण्यासाठी लागलेल्या वेळेपेक्षा अधिक आहे. 2010 मध्ये हे लोकांसाठी उघडण्यात आले. सध्या याचे ग्रेनाइट आणि स्टीलने बनलेले 400 पॅनल तयार आहेत. वरील भागाचे काम सध्या सुरू आहे.

पहिल्यांदा हे चर्च बनवण्याचा विचार आला तेव्हा गौदी पहिले आर्किटेक्ट नव्हते. या प्रोजेक्टचे पहिले आर्किटेक्ट हे फ्रांसिस्को डी पाउला डेल विलार वाई लोजानो हे होते.

या चर्चला नियो-गॉथिक स्टाईल ( गोल आकाराचे घुमट) मध्ये बनवण्याचा विचार त्यांचाच होता. मात्र फंड देणाऱ्या व्यक्तीशी विचार न जुळल्यावर त्यांनी काम सोडून दिले.

लोजानो यांच्यानंतर 1983 पासून गौदी यांच्या देखरेखी खाली सग्रादाला घंटा घर टॉवर बनवण्यात आले. 1926 मध्ये एका दुर्घटनेत गौदी यांचा मृत्यू झाला. 1936 ते 1950 दरम्यान चर्चचे काम संथगतीने सुरू होते. मात्र गौदींनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात चर्चसाठी अशी योजना बनली जी त्यांनतर देखील कामास आली. याआधी हा प्रोजक्ट 2010 मध्ये पुर्ण होणार होता.  मात्र नंतर ही तारीख 2026 मध्ये ढकलण्यात आली. कारण 2026 मध्ये गौदी यांची शंभरावी पुण्यतिथी आहे.  सग्रादाबरोबरच जगाला असा मास्टरपीस देणारे गौदी यांना देखील लोकांनी लक्षात ठेवावी असे चर्चच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment