Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!


टोकियो – आपला आक्रमक फॉर्म कायम राखत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल सिंधू दूर आहे. सिंधूसमोर उपांत्यफेरीच्या लढतीत ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला.