‘भुज’मधील ‘जालिमा कोका कोला’ गाण्यातील नोरा फतेहीच्या डान्स स्टेप्सवर फॅन्स घायाळ


लवकरच सुपरस्टार अजय देवगण याच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही झळकणार आहेय अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अदाकारीमुळे बरीच चर्चेत आली आहे. नोरा नेहमीच तिच्या डान्स व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतेच. पण आता तिचे भुज चित्रपटातील नवे गाणे ‘जालिमा कोका कोला’ हे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात तिने आपल्या डान्स स्टेप्सनी साऱ्यांनाच घायाळ केले आहे. अभिनेत्री नोरा फतेहीचे या गाण्यातील ठूमके पाहून तिचे फॅन्स दिवाने झाले आहेत. हे गाणे रिलीज होताच काही तासांमध्येच हिट झाल्यामुळे आता ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नुकतेच अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील बहूप्रतिक्षीत ‘जालिमा कोका कोला पिला दे’ गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे गायिका श्रेया घोषाल हिने गायले आहे. हे गाणं टी-सीरीजच्या बॅनरअंतर्गत रिलीज करण्यात आले असून याचे बोल वायुने लिहिले आहेत. या गाण्यात फॅन्सना घायाळ करणारे डान्स स्टेप्स हे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीचा या गाण्यात अनोखा अंदाज दिसून आला. या गाण्यात निळ्या रंगाचे शॉर्ट स्लिट स्कर्ट आणि टॉप परिधान करून आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. सोबतच हातात बांगड्या आणि ज्वेलरीमुळे तिचा हा देसी लूक फॅन्सना पसंतीस पडला आहे. या गाण्यात तिने आपल्या धमाकेदार डान्सने फॅन्सना आपल्या तालावर थिरकवले आहे.

अभिषेक दुधैया दिग्दर्शित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपट अभिनेता अजय देवगण तत्‍कालीन भुज एअरपोर्टचा इन्चार्ज विजय कार्णिक यांची भूमिका साकारत आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.