भारतात टेस्लाच्या कार लवकरच लाँच करु… पण; एलन मस्क यांनी केला मोठा खुलासा


नवी दिल्ली : भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार कधी दाखल होतील, याबाबतची औपचारिक घोषणा झालेली नसली तरी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे म्हणणे आहे की, भारतात आपल्या कार त्यांची कंपनी लाँच करू इच्छिते. परंतु भारतात इलेक्ट्रिक कारची इंम्पोर्ट ड्युटी जगात सर्वाधिक आहे. एका ट्विटर युजरने मस्क यांना टेस्लाच्या कार लवकरात लवकर भारतात लाँच कराव्यात असे आवाहन केले होते.

मस्क यांनी म्हटले, भारतात कार लाँच करण्यास आम्ही देखील उत्सुक आहोत. पण भारतात आयात शुल्क अधिक आहे. तसेच क्लिन एनर्जी वाहनांना डिझेल आणि पेट्रोलसारखे समजले जाते. टेस्लाने याचवर्षी भारत सरकारला एसेम्बल कारांवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु भारत सरकार टेस्लाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक पातळीवर मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी अनेक उद्योगांची इम्पोर्ट ड्युटी सरकारने वाढवली आहे.