मुंबई – पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना आता थेट पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. अनेकांना हे काहीसे आश्चर्यकारक वाटत असले तरी असे होऊ शकते. तसा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्रालय तयार करत आहे. तशी माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या तमाम कर्मचाऱ्यांना एक नवी संधी हा प्रस्ताव विधिमंडळातून मंजूर झाल्यानंतरच निर्माण होऊ शकणार आहे.
गृहविभागाच्या प्रस्तावामुळे पोलीस शिपाई होणार उपनिरिक्षक; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
आपल्या ट्विटर हँडलवरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
यंदा दोन दिवसांचेच राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. हा कालावधी कोरोना व्हायरस संकटामुळे कमी करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा हे अधिवेशन 5 आणि 6 जुलै या कालावधीत पार पडत आहे. दरम्यान, संबंधित प्रस्तावावर अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात एक मंत्रिमंडळ बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात येईल, दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलीस सेवेत एखादा तरुण/कर्मचारी पोलीस शिपाई म्हणून भरती झाला. तर त्याला निवृत्तीपर्यंत विशिष्ट पदापर्यंत पोहोचता येते. त्यासाठी पदसंख्या, आरक्षण, पात्रता यासोबतच इतरही अनेक निकष लागू असतात. हे निकष तर लागू असतीलच. परंतू, त्याही पुढे पोलीस शिपायाला निवृत्त होतोना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी राज्याचा गृहविभाग एक प्रस्ताव तयार करत आहे.