मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत असून राज्यातील कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण राज्यात रविवारी कोरोनाबाधितांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे.
कोरोनाचा प्रकोप; राज्यात काल दिवसभरात 63,294 कोरोनाबाधितांची नोंद
आतापर्यंत राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,21,14,372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,07,245 (15.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,२694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.