निरोगी राहण्याचे सोपे उपाय

fittness
निरोगी आयुष्य कसे जगावे यावर अनेक तज्ञ अनेक गोष्टी सांगत असतात. व्यायाम करावा, खाण्यापिण्याचे नियम पाळावेत, निव्यर्सनी असावे हे नियम तर आहेतच आणि ते योग्यही आहेत. परंतु आपण आपल्या आसपास बघतो तेव्हा काही लोक या गोष्टी न करतासुध्दा छान आयुष्य जगत असतात. त्याचे कारण काय याचा पत्ता आपल्याला लागत नाही. परंतु आरोग्याच्या रक्षणासाठी त्यांच्या हातून काही गोष्टी नकळत घडत असतात आणि त्याच त्यांना निरोगी ठेवत असतात. त्या गोष्टी एकदम साध्या असल्यामुळे त्याच्यामुळे आपण निरोगी आहोत हे त्या लोकांनासुध्दा माहीत नसते. अशा काही गोष्टी आपण आवर्जुन केल्या तर आपल्यालाही निरोगी आयुष्य लाभू शकते.

अशा नकळतपणे होणार्‍या गोष्टीमध्ये हसणे ही एक गोष्ट आहे. काही लोक मनसोक्तपणे हसतात. मोठ्यांदा हसतात. तसे हसताना तुमच्या शरीरात ताजा ऑक्सिजन जास्त प्रमाणात ओढला जाऊन शरीरभर खेळायला लागतो. विविध अवयवांमध्ये तो नवजीवन निर्माण करतो. रक्ताभिसरण वेगवान होते आणि आपोआपच तणाव निवळायला मदत होते. हाच न्याय पाळीव प्राण्यांच्या बाबतीतसुध्दा लागू होतो. घरात कुत्रा किंवा मांजर पाळणार्‍यांना त्यांच्या निमित्ताने काही व्यायाम तर होतोच परंतु त्या प्राण्यांना आंजारताना गोंजारताना शरीरातील काही विशिष्ट हार्मोन्स पाझरायला लागतात. त्यामध्ये सिरोटोनीन आणि प्रोलॅक्टीन यांचा समावेश होतो. त्यांच्यामुळे तणावाची पातळी कमी होते.

काही लोकांना सातत्याने संगीत ऐकण्याची आवड असते आणि ते लोक जाता येता रेडिओ ऐकत असतात. आपल्य आवडीची गाणी ऐकत असतात. त्याचेही चांगले परिणाम शरीरावर होत असतात आणि तणाव निवळतो. संत्र्यांच्या रसामध्ये ती ताकद चांगली असते. व्यायाम करण्याने हाच फायदा होतो. शरीरसंबंधातसुध्दा हे फायदे होतात. आपल्या आवडीचा सुगंध घेण्यानेसुध्दा हा परिणाम साधला जातो. त्यामुळे नियमित व्यायाम न करणारे परंतु रसिक लोक तणावरहीत जीवन जगू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment