नवीन फ्लॅट खरेदीवर आता भरावी लागणार 5 टक्के स्टॅम्प ड्यूटी


मुंबई : मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटीतील सवलतीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून दरम्यान तत्पूर्वी 3 महिने मुदतवाढ दिली जाईल, असे सांगितले जात होते. पण याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोध केल्यानंतर ही मुदतवाढ मागे घेण्यात आल्यामुळे आता नवीन फ्लॅट घेताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे ठप्प असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये दोन टक्के सवलत दिली होती. 3 टक्के सवलत डिसेंबर 2020 पर्यंत दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत 2 टक्के सवलत देण्यात आली होती. पण आता ही सवलत रद्द केली गेली असून आता पूर्ण 5 टक्के मुंद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

मुद्रांक सवलतीला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. पण त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे मुद्रांक शुल्कात 2 टक्के दिलेली सवलत आज संपुष्टात आली आहे. अर्थ खात्याचा देखील या मुदतवाढीला विरोध होता. त्यामुळे नवीन घर खरेदी करताना आता 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.