अशा प्रकारे तुम्ही TrueCaller वरुन हटवू शकता आपला नंबर तसेच बदलु शकता आपले नाव


मुंबई : आपल्या सगळ्यानांच माहित आहे की TrueCaller हे अॅप एक कॉलर आयडी अॅप आहे. या अॅपमुळे युझर्सना अनओळखी नंबरवरून येणारे कॉल ओळखण्यास मदत होते. जे फसवणारे कॅाल असल्याची माहिती देखील या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त केली जाते.

TrueCaller चा वापर करण्यासाठी आपल्याला ट्रू कॅालरवर आयडी तयार करावा लागेल आणि त्यामध्ये आपले नाव टाकावे लागेल. काही लोक त्यामध्ये आपले टोपण नाव देखील ठेवतात. पण जर आपल्यापैकी कोणाला ट्रू कॅालरमधून आपले नाव बदलण्याचा विचार आहे किंवा अॅपच्या यादीतून स्वत:चे नाव रद्द करायचे असेल तर, त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

Android, iOS, Desktop वापरणारे TrueCallerमध्ये अशा प्रकारे बदलतील आपले नाव

 • आपल्या Android किंवा iOS फोनवर TrueCaller अ‍ॅप उघडा.
 • iOS मधील More ऑप्शनवर टॅप करा. तसेच Android साठी डाव्या कोपऱ्यातून मेनूची निवड करा.
 • तुम्हाला येथे Edit your Profile ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
 • तुमचे डिटेल्स येथे तुम्हाला मिळतील.
 • आता, तुम्हाला TrueCaller आयडीसाठी जे नाव दाखवायचे आहे, ते टाका. यानंतर ते सेव्ह (save) करा.
 • आपण अशा प्रकारेच डेस्कटॉपद्वारे देखील TrueCaller मधून आपले नाव बदलू शकता. यासाठी, Truecaller website> log into the platform with your details> Enter your phone number> Select the Suggest Name option>हे पर्याय निवडून नवीन नाव जोडून आणि सेव्ह करु शकता.

अशा प्रकारे TrueCaller वरून हटवू शकता आपला मोबाईल नंबर

 • आपल्या फोनमधील TrueCaller अॅप उघडा.
 • iOS वापकर्त्यांनी More आणि Android वापरकर्त्यांनी Menu पर्यायावर क्लिक करावे.
 • आता सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करावे.
 • तेथीव प्रायव्हसी सेंटर ऑप्शन निवडा.
 • त्यानंतर Deactivate Account ऑप्शन निवडावे लागेल.
 • हे सर्व केल्यावर, Truecaller Unlist पेजवर जा.
 • त्याठिकाणी आता कंट्री कोडसोबत आपला मोबाईल ऍड करा.
 • त्यानंतर Analyst option वर टॅप करा आणि डिएक्टिवेशनसाठी कोणते ही कारण द्या.
 • आता आपल्यासमोर आलेला CAPTCHA सादर करा आणि नंतर अनलिस्ट पर्यायावर टॅप करा. आपला फोन नंबर 24 तासांच्या आत यातून अनलिस्ट होईल.