फायझरचा दावा : आमची कोरोना लस आमची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक


बर्लिन – आपली लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक असल्याचा दावा कोरोना प्रतिबंधक लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने केला आहे. यासंदर्भात सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी कंपनीने म्हटले की, अमेरिकेतील 2,250 मुलांवर झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ही लस 100% परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

व्हॅक्सिनची चाचणी ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाली होते. आता याचे परिणाम समोर आले आहेत. या लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा 12 वर्षीय अभिनवने फायझरची लस घेतली होती. कोरोना व्हॅक्सिन घेणाऱ्या सर्वात कमी वयांच्या मुलांमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचे वडील शरत डॉक्टर असून, कोरोना व्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये सामील होते. अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये अभिनवने कोरोना लस घेतली.

मागच्या महिन्यात कंपनीने 6 महिन्यांपासून 11 वर्षापर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी फेज 1,2,3 च्या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास सुरू केला आहे. यादरम्यान, 5 ते 11 वर्षांच्या मुलांना पहिला डोस देण्यात आला. कंपनी पुढच्या आठवड्यापासून 2 ते 5 वर्षांच्या मुलांना लस देण्याच्या तयारीत आहे.