मुंबई – १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
‘एमपीएससी’च्या नव्या सुविधेमुळे होणार ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणींचे निवारण
सद्यस्थितीत ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी/शंकाचे या टोल फ्री क्रमांकावर निवारण होईल. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण देखील केले जाणार आहे. वरील टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनी संभाषणाचे (टेलिफोन कॉल्स) आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे.
२ मार्च २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार व रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० यावेळेत हे टोल फ्री क्रमांक कार्यान्वित राहणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधे व्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे.