सरकारी योजनेसह या पाच गोष्टी Google वर चुकूनही करू नका सर्च


नवी दिल्लीः सध्याच्या डिजीटल युगात आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चुटकी सरशी मिळते. त्यातच जाएंट सर्च इंजिन गुगल सर्वात आघाडीवर आहे. कोणतीही समस्या असो, त्यावेळी अनेक जण आपल्याला Google Search कर असे सांगतील पण, गुगलवर काही गोष्टी सर्च न करणे हे केव्हाही फायद्याचे आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. गुगल सर्चमध्ये आपल्याला हवी असलेली माहिती अवघ्या एका सेकंदात मिळते. पण, काही विशिष्ट गोष्टींचे सर्चिंग हे धोक्याचे ठरू लागले आहेत.

  • तुम्ही जर ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर गुगलवर यासंबंधीची माहिती चुकूनही शोधण्याच्या भानगडीत पडू नये. कारण सध्या ऑनलाईन फसवणूकीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी सायबर गुन्हेगार टपून बसलेले आहेत. दिसायला एकदम बँकेसारखीच माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देतात. परंतु, ते बँकिंग डेटा चोरी करू शकतात. तसेच तुमचे बँक खाते सुद्धा रिकामे करू शकतात.
  • कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर गुगल सर्चवर चुकूनही सर्च करू नये. या ठिकाणी तुम्हाला सायबर क्रिमिनल चुकून कस्टमर केअर नंबर देऊन तुमची आवश्यक माहिती चोरी करू शकतात. ही माहिती चोरी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • तुमचे आयुष्य सोपे बनवण्याचे काम मोबाइल अॅप्स आणि सॉफ्टवेअर करीत असते. पण, अनेकदा मिळते जुळते अॅप्स आणि सॉफ्टवेअर सायबर गुन्हेगार गुगल सर्च मध्ये टाकत असतात. त्याला तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्यातून ते तुमची पर्सनल माहिती चोरी करू शकतात. तसेच यामुळे फोनमध्ये किंवा कंप्यूटरमध्ये व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • गुगलवर सरकारी योजनांचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कारण, हि प्रकरणे हल्ली खूप वाढली आहेत. सरकारी योजनांसंबंधी अनेकांना फारशी माहिती नसते. काही लोक याचा गैरफायदा घेत असतात. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सरकारी योजनेची माहिती घेणे कधीही चांगले आहे.
  • अनेकदा आपल्याला ऑनलाइन शॉपिंग दरम्यान कूपन कोड द्वारे डिस्काउंट दिले जातात. परंतु, अनेकदा फ्री कूपन कोडसाठी गुगलवर सर्चिंग केले जाते. एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल सर्चची मदत कूपन कोड शोधण्यासाठी घेणे धोक्याचे ठरू शकते. सायबर क्रिमिनल फेक कूपन कोड टाकून त्यातून तुमची फसवणूक करण्यासाठी बसलेले आहेत.