सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे लसूण सोलण्याची ही पद्धत


किचनमधील अनेक हटके टिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विविध प्रकारच्या रेसिपी असो किंवा किचनमध्ये मदत होऊ शकणाऱ्या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये सोप्या पद्धतीने लसूण कसा सोलला जाऊ शकतो, हे दाखवण्यात आले आहे. लसूण सोप्या पद्धतीने देखील सोलला जाऊ शकतो हे 12 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ अतिशय कमी कालावधीत व्हायरल झाला असून यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.


हा व्हायरल व्हिडीओ टीक-टॉकवरील असून टीक-टॉकवरील @xwowduck या युजरने ओरिजिनली हा व्हिडीओ शेअर केला आहे. 1.5 मिलियन व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. या युजरने यामध्ये आपल्या सासूला याचे श्रेय दिले असून आपण ही पद्धत त्यांच्याकडून शिकल्याचे म्हटले आहे. लसणाच्या कांडीला दोन समान भागामध्ये कापून त्यानंतर त्याला थोडे दाबले असता लसणाच्या पाकळ्या अतिशय सुटसुटीत होताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लसूण सोलण्याच्या अतिशय सोप्या पद्धतीने लोक प्रभावित झाले आहेत. ही सोपी पद्धत खरच उपयोगी असल्याचे म्हणत first we feast या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.