महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील, वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट


नागपूर – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मीडिया ट्रायलचा वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा परिणाम असल्याची टीका केली आहे. सतत एका मंत्र्याचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

विजय वडेट्टीवार या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना म्हणाले की, शिवसेनेच्या एकाही नेत्याने आतापर्यत राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण, यात तथ्य असेल तर हा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असे वडेट्टीवार म्हणाले.

सतत एका मंत्र्याचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार मंगळवारी मातोश्रीवर संजय राठोड यांनी आपला राजीनामा पाठवला असून तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी हा राजीनामा त्यांनी दिला की इतर काही कारणासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासोबतच, राठोड यांच्या एका जवळच्या व्यक्तीने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. सोबतच, ही एक अफवा असल्याचाही दावा केला.