‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर


ऑस्करच्या शर्यतीतून चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट बाहेर पडला आहे. सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. देशभरातील २७ चित्रपटांची निवड या पुरस्कार स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता. पण, आता या शर्यतीतून चित्रपटाला बाहेर पडावे लागले आहे.

ऑस्करचा यंदा ९३ वा पुरस्कार सोहळा रंगणार असून ऑस्करसाठी भारताकडून ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या पाठवण्यात आला होता. हा चित्रपट फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पण, आता या स्पर्धेतून चित्रपटाला बाहेर पडावे लागले आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.

ऑक्टोंबर २०१९ मध्ये ‘जलिकट्टू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लक्षवेधी बाब म्हणजे अनेक पाश्चात्य समिक्षकांनीही या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली होती. परिणामी ‘फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’ने या ‘जलिकट्टू’ची ऑस्कर स्पर्धेसाठी निवड केली होती.