कंगना म्हणते; टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट मी करु शकते


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा वादातही अडकली आहे. दरम्यान आता एक नवे वक्तव्य कंगनाने केले असून त्यात कंगनाने अ‍ॅक्शन स्टंट करण्यात स्वत:ला हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुजपेक्षा चांगली असल्याचे म्हटले आहे.


एक ट्विट कंगनाने रिट्विट केले आहे. तिने या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मणिकर्णिका चित्रपटाचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक निक पॉवेल म्हणाले की टॉम क्रुज पेक्षा चांगले स्टंट मणिकर्णिका या चित्रपटात कंगनाने केले आहेत. कंगना हे ट्विट रिट्विट करत म्हणाली, हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे सुप्रसिद्ध अ‍ॅक्शन दिग्दर्शक ज्यांनी दिग्दर्शन केले आहे, त्यांचे असे म्हणणे आहे की टॉम क्रुजपेक्षा चांगले अ‍ॅक्शन स्टंट मी करू शकते. कंगना या ट्विटमुळे प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

कंगना या आधी केलेल्या दोन ट्विटमुळे ट्रोल झाली होती. कंगनाने एका ट्विटमध्ये संपूर्ण जगात आपल्यासारखी प्रतिभावान अभिनेत्री कोणीच नसल्याचे म्हटले होते. तर कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये स्वत:ची तुलना ही तिनवेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेत्री मेरील स्ट्रिप आणि हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटशी केली होती.